नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अक्कलकुवा अंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदासाठी रिक्त असलेल्या जागासाठी संबंधित महसुली गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांकडून 6 जुलै 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

एकात्मिक बालविकास सेवा योजना अक्कलकुवा प्रकल्पातंर्गत खडके, कोलवीमाळ, सिंगपुर बु. कुंभारखान, गव्हाळी, रतनबारा-1, दसरापादर, खडकापाणी, जारी मौली येथील अंगणवाडी केंद्रातील 9 अंगणवाडी सेविका रिक्त पदासाठी अर्ज  मागविण्यात आले आहेत.

तसेच नवलपूर, सिंगपुर खुर्द, सिताफळी, इंदिरानगर, सोरापाडा-1, अक्कलकुवा-3, मिठ्याफळी-1, टिमकमौली, नैनशैवडी, डोंगरीपाडा, ईश्वर कोराई, उदेपुर वरचे, खडकुना, काकडीआंबा-1, नवापाडा-1, ठाणा, मोगरा अंगणवाडी केंद्रातील मदतनीसाच्या 17 रिक्तपदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी  केवळ त्या गावातील रहिवासी असणे आवश्यक आहे. विहीत नमुन्यातील अर्ज व शैक्षणिक पात्रता व इतर माहितीसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, अक्कलकुवा  पंचायत समिती ता.अक्कलकुवा येथे संपर्क साधावा.