नंदुरबार (प्रतिनिधी ) – कोरोणा विषाणुमुळे उद्भवालेल्या परिस्थीतीमध्ये साई मदीराचा वर्धापनदिन कार्यक्रम साजरा करत येणार नसल्याने हरिओम नगर परिसरातील रहिवाश्यांनी आणि साईप्रेमीनी रक्तदान शिबिराचे आयोजन करत सामाजीक बांधीलकी जोपासत नवा आदर्श निर्माण केला आहे.

      हरिओम नगर मधील साईबाबा मंदीर हे अनेक साईभक्तांचे आस्थाकेंद्र आहे. दरवर्षी या ठिकाणी 31 मे रोजी या मंदीराच्या वर्धापण दिनानिमित्त अनेक धार्मिक विधींचे आयोजन करत भंडाऱयाचा कार्यक्रम केल्या जातो. मात्र यंदा कोरोणा विषाणुच्या अनुशंगाने निर्माण झालेली परिस्थीती आणि त्यातच सोशल डिस्टसिंग सह अन्य नियमांचे पालन करावयाचे असल्याने साई भक्तांनी पुढे येत या दिनाचे औचित्य साधत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात परिसरातील 40 साई भक्तांनी रक्तदान करत सामाजीक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. साई बाबांची सर्वधर्म समभावाची शिकवन रक्तदान सारख्या उपक्रमापेशा काय वेगळी असु शकते याचमुळे परिसरातील नागरीकांनी गरजु रक्तापासुन वंचीत राहुनये या भावनेतुन हा उपक्रम राबवला आहे.   

      या शिबिरात दिगंबर उपाध्ये, ऋत्विक चव्हाण, लक्ष्मीकांत बयानी, वैभव तांबोळी, अजय केदार, निसर्गदत्त बारी, गणेश मोरे, घनश्याम बारी, हितेश तांबोळी, स्वप्निल तांबोळी, प्रशांत तांबोळी, भारत मोरे, अथर्व रत्नाकर, प्रितेश कुवर, कल्पेश तांबोळी, राकेश तांबोळी, नरेंद्र ठाकूर, अजय मोरे, प्रमोद शिंदे, राहुल गायकवाड, नितीन जोशी, विजय तांबोळी, राजेश दुबे, तृप्ती बयानी, नीलिमा रत्नाकर, सागर मोरे, जितेंद्र सोनार, लखन सोनार, ऋषिकेश पाटील,  अविनाश गवळी अशा  एकूण 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले