नंदुरबार (प्रतिनिधी) :-शिक्षक भारती नंदुरबार जिल्ह्याच्या कार्यकारणीत जिल्हा उपाध्यक्ष पदी महेश नांद्रे , संघटक पदी तुषार सोनवणे तर सहकार्यवाह पदी पुष्कर सूर्यवंशी यांची एक मताने निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष राहुल पाटील व कार्याध्यक्ष आशिष दातीर यांच्या सहिने नियुक्ती पत्र देण्यात आले.


महेश नांद्रे, तुषार सोनवणे, पुष्कर सुर्यवंशी हे गेल्या अनेक वर्षांपासून जुनी पेन्शन, विनाअनुदानित शाळा, अतिरिक्त शिक्षक, जिल्ह्यातील शिक्षकांचे विविध प्रश्न या चळवळीत सक्रिय सहभागी होत आहेत. शिक्षकांचे ज्वलंत प्रश्न मार्गी लागावे यासाठी मुंबई, नागपूर या ठिकाणी झालेल्या आंदोलनात त्याचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल शिक्षक भारतीचे मार्गदर्शक आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, नाशिक विभागाचे अध्यक्ष राजेंद्र लोंढे, शिक्षक भारती संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राहुल पाटील, इकबाल शेख उमर, आशिष दातीर, राजेश जाधव, सतिष मंगळे, गोरख पाटील, संजय पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.