नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, नंदुरबार यांच्यामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षांत व्यवसायीक, बिगर व्यवसायीक, कनिष्ठ महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.

तरी पात्र विद्यार्थ्यांनी 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत गृहपाल, गुणवंत मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह, करण चौफुली परीसर, नंदुरबार तसेच गृहपाल, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, होळ तर्फे हवेली,नंदुरबार आणि शहादा येथील गृहपाल, मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह मोहिदे त.श. येथे वसतीगृह प्रवेशासाठी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त, देविदास नांदगांवकर यांनी केले आहे.