शिंदखेडा(प्रतिनिधी):- आंदोलनातून भाजपानं कोरोना वारीयर्सच्या कार्यपद्धती वर शंका व्यक्त केली, यासाठी माय बाप जनता भाजपाला कदापि माफ करणार नाही, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांनी केला आहे.

याबाबत धुळे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि, कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यात मुंबई ,पुणे मध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. कमी अधिक प्रमाणात सर्वच शहरात परिस्थिती वाईट असली तरी सुधारते आहे. महाविकास आघाडीचे सरकार जोमाने काम करित आहे. मालेगाव व धुळे या दोन शहरातील कोरोना रुग्णांची संख्या देखील वाढते आहे, मालेगाव व धुळे शहरात  एम.आय.एम पक्षाचे आमदार तर खासदार हे भाजप चे आहेत याउलट भाजपाने  सरकारच्या कार्यपद्धतीवर ठपका ठेवून हे सरकार कोरोनाची स्थिती हाताळण्यास असमर्थ ठरल्याचे म्हटले आहे. याकरिता भाजपाने काल माझे अंगण माझे रणांगण, असा नारा देत महाराष्ट्र बचाव आंदोलन केले. काळे झेंडे, काळ्या फिती काळ्या रंगाचेच मास्क घालून भाजपा नेत्यांनी आंदोलन केले.
भाजपाच्या या आंदोलनाची अनेक स्तरातून टीका झाली आणि ते आंदोलन निंदनिय आहे, असेही म्हटले आहे. त्यातच धुळे राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसेंनी भाजपावर निशाणा साधला आहे. आंदोलनातून भाजपानं कोरोना वारीयर्सच्या कार्यपद्धती वर शंका व्यक्त केली, यासाठी माय बाप जनता भाजपाला कदापि माफ करणार नाही.
संकटात सापडलेला तुमच्या आमच्या जिल्ह्याला सावरण्यासाठी एकजुट महत्वाची आहे. असं असताना महाराष्ट्रद्रोही भाजपानं आंदोलन करून लढा देणाऱ्या महसूल अधिकारी- कर्मचारी डॉक्टर, आरोग्य अधिकारी- कर्मचारी ,पोलीस अधिकारी- कर्मचारी,आशा सेविका,शिक्षक, सफाई कर्मचारी आणि इतर सर्व प्रशासकीय यंत्रणेचा अपमान केला आहे. जनता हे कधी विसरणार नाही आणि माफही करणार नाही,” आतातरी विरोधकांनी आंदोलने करून करोना योद्ध्यांचा अपमान करण्यापेक्षा सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी भाजपावर टीकेचा बाण सोडला आहे.