नंदुरबार (प्रतिनिधी) :- येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता श्री रमेश चौधरी यांचा सुपुत्र चि मंदार याने इयत्ता १० वीच्या परीक्षेत ९३.४० % गन मिळवुन सातपुडा विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला.
शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील श्री सातपुडा माध्यमिक विद्यालय या शाळेत १० विच्या (एसएससी) परीक्षेत मंदार रमेश चौधरी हा 93.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
या यशाबद्दल जीवन साधना विद्या प्रसारक मंडळाचे चेअरमन श्री दीपक पाटील, सचिव सौ जयश्री पाटील, समन्वयक श्री मकरंद पाटील यांनी त्याचे कौतुक केले. तर शाळेतर्फे मुख्याध्यापक श्री पी. जी. पाटील, उपमुख्याध्यापक श्री एस. आर. पाटील , पर्यवेक्षक श्री जी. एम. माळी यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मंदार चौधरी हा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार चे वरिष्ठ अधिव्याख्याता श्री.रमेश गोकुळ चौधरी यांचा मुलगा आहे.