नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी 35 कोटी 17 लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यापैकी 21 कोटी 10 लाख केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा असणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या आराखड्यास मंजूरी देण्यात आली. यावेळी सहायक जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा, वसुमना पंत, मत्स्य व्यवसाय सहायक आयुक्त किरण पाडवी आदी उपस्थित होते.

नवीन तलावाची निर्मिती, अस्तरीकरणाचे तळे, मत्स्य बोटुकले संचयन आदी  14 योजनांचा या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. हा आराखडा शासनास सादर केला जाणार आहे.