नंदुरबार :- रात्री उशिरा प्राप्त अहवालांमध्ये जिल्ह्यात पुन्हा ९ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या तब्बल १५४ वर जाऊन पोचली आहे. आज सायंकाळी आलेल्या अह्वालांमध्ये ३८ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यामुळे आज आढळलेल्या पॉझीटिव्ह रुग्णांची संख्या ४७ झाली आहे.

रात्री उशीरा प्राप्त अहवालांनुसार पॉझीटिव्ह आढळुन आलेल्या बाधीतांमध्ये ज्ञानदीप सोसायटी नंदुरबार येथील २ पुरुष २३, ५७, सिंधी कॉलनी नंदुरबार येथील २ पुरुष २२, ३५, घोडपीर मोहल्ला येथील १ महिला ६५, एलीझा नगर धुळे रोड येथील एक पुरुष ४९, परळ नगर, नळवा रोड येथील १ पुरुष ५२ तर जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथील २ पुरुष २४, २५ अशा ९ जणांचा समावेश आहे. आता जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या १५४ वर पोहोचली असून, त्यापैकी ५२ जण उपचार घेऊन घरी परतले आहेत. तर ६ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत व दोघांवर धुळे येथे उपचार सुरु आहेत.