नंदुरबार (जगदीश ठाकुर)- जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या युवक आघाडी च्या वतीने दि.10 रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री ना.रामदास आठवले यांच्या आदेशाने विविध मागण्यांसाठी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.
यावेळी JNU मधील हिंसाचार करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करा, महाराष्ट्र शासनाचे सुशिक्षित बेरोजगारांना उद्योगधंद्यासाठी देण्यात आलेले सर्व महामंडळांचे कर्ज माफ करण्यात यावे,शेतकऱ्यांचे संपुर्ण कर्ज माफी करून 7/12 कोरा करण्यात यावा, या मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील, नंदुरबार जिल्हा सरचिटणीस राम साळुंके, नंदुरबार युवक जिल्हा उपाध्यक्ष दिनेश तेजी, नंदुरबार शहराध्यक्ष सुलतान पिंजारी, रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी, नंदुरबार तालुका युवक उपाध्यक्ष गणेश पवार, नंदुरबार युवक शहर उपाध्यक्ष गणेश शिरसाठ, नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष अनिल कुवर, गौतम पानपाटील, जिल्हा उपाध्यक्ष गौतम पवार, जिल्हा युवक कार्याध्यक्ष राजेंद्र बिरारी, अक्कलकुवा तालुका अध्यक्ष बापू महिरे ,युवक शहराध्यक्ष रवींद्र रामराजे शहादा, नंदुरबार युवक तालुकाध्यक्ष जितेंद्र पवार, शहादा युवक तालुकाध्यक्ष दीपक अहिरे, युवक तालुका उपाध्यक्ष विनोद सामुद्रे, तळोदा तालुकाध्यक्ष बिल्डर अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मुक्तार मिस्तरी व रिपाई (आठवले ) पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.