नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी अभिवादन केले. डॉ.भारुड यांनी भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, शाहूराज मोरे, तहसीलदार उल्हास देवरे आदी उपस्थित होते. यावेळी एकता दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली.