नंदुरबार दि.27- जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांना किंवा अभ्यागतांना जिल्हाधिकारी किंवा अन्य अधिकाऱ्यांची भेट घेता येणार नाही.

नागरिकांनी प्रत्यक्ष कार्यालयात न येता व्हॉट्सॲप किंवा ईमेलद्वारे निवेदन द्यावे, असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी आदेशित केले आहे. नागरिकांनी आपला अर्ज किंवा निवेदन tapalndb@gmail.com या ईमेलवर पाठवावे किंवा 8888137967 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे सादर करावे. या आदेशाचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी पालन करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.