नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : येथील बिलाडी रोड ईदगाह मैदान परिसरात 8 ते 20 डिसेंबर 2020  या कालावधीत वार्षिक गोळीबार सराव घेण्यात येणार असल्याने पोलीस अधिकारी-कर्मचारी यांचेव्यतिरिक्त प्रतिबंधीत क्षेत्रात वरील कालावधीत कोणालाही प्रवेश करता येणार नाही. नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील तसेच जिवित अथवा वित्तहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी व सदर क्षेत्रात गोळीबाराचे कालावधीत येऊ नये, असे जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी कळविले आहे.