नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी आधार क्रमांकाचा वापर करुन फेसलेस सेवेचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीय सूचना केंद्रामार्फत वैद्यकीय प्रमाणपत्र नमुना 1 (अ) मध्ये वैद्यकीय व्यवसायिका मार्फत ऑनलाईन पध्दतीने भरुन अपलोड करण्याची सुविधा विकसित करण्यात आली असून मोटार वाहन कलम 8 (3) अन्वये शिकाऊ अनुज्ञप्ती परवानासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन नियम 5 (1) नुसार एम.बी.बी.एस पदवीधारक करणाऱ्या वैद्यकीय व्यवसायिकांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

 त्यानुसार वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्ह्यातील वैद्यकीय व्यवसायिकांना यूजर आयडी देण्यात येणार असून पात्र  वैद्यकीय व्यावसायिकांनी विहीत नमुन्यात माहिती सादर करावी. अधिक माहितीसाठी  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, दूध  भवन, साक्री रोड, नंदुरबार (02564-210129) येथे संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांनी केले आहे.